
चिरेखाणीवर काम करण्यासाठी आलेल्या महिलेला मुलीसह पळवले
संगमेश्वर : तालुक्यातील करजुवे राऊळवाडी येथे चिरेखाणीवर काम करणाऱ्या महिलेला आणि त्याच्या अल्पवयीन मुलगीला दोघांनाही फूस लावून अज्ञात इसमाने पळवून नेले असल्याची फिर्याद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे . भारती काळु कोरकु हिने घरात कोणास काही न सांगता मुलगी कु. वैष्णवी काळु कोरकु वय 02 वर्षे रा. मुळ रा. रायतलाई ता. खटनार जि. बुराणपुर, सध्या रा. करजुवे राऊळवाडी ता. संगमेश्वर जि.रत्नागिरी हिला तीची आई सौ. भारती कोरकु हिचे कायदेशीर रखवालीतुन कोणीतरी अज्ञात इसमाने वाईट हेतुने फुस लावुन पळवून नेले आहे.याबाबत सुनील रामचंद्र कासदे, वय २४ यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोनि सुरेश गावीत करीत आहेत.