
पटवर्धन हायस्कुलच्या पाच विद्यार्थ्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
रत्नागिरी: भारत शिक्षण मंडळ संचलित पटवर्धन हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या पाच खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने दि. १९ डिसें. रोजी प्रशालेच्यावतीने रत्नागिरी शहरात ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
लातूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेत पटवर्धन हायस्कुलच्या संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. दरम्यान हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामध्ये कु. आदित्य मंगेश जाधव, कु. तेजस दिपक शिवगण, कु. हर्ष रवि शिवलकर, कु. अर्थव अमोल मयेकर व कु. श्रेया योगेश शिवलकर यांचा समावेश आहे. डॉजबॉलचा संघ व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंची रत्नागिरी शहरात वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.