
इरफान उर्फ दाऊद होडेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर
रत्नागिरी : इरफान उर्फ दाऊद होडेकर यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. शहरातील चर्मालय रोड येथील एका हॉटेल मालकाने त्यांच्याविरुद्ध मारहाण करून खंडणी मागितल्याची तक्रार केली होती. या प्रकरणाला आता राजकीय रंग चढण्याची शक्यता आहे.
दाऊद होडेकर हे चर्मालय मार्गावरील अरेबियन डिलाईट हॉटेलमध्ये २९ नोव्हेंबर रोजी कुटुंबासह जेवायला गेले होते. त्यावेळी हॉटेल मालक सद्दाम कादीर मालदार यांच्याशी भांडण झाले. यावेळी दाऊद होडेकर यांनी मारहाण करून ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार केली होती.
या संदर्भात ६ डिसेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर दाऊद होडेकर यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. शुक्रवारी न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.