
खाडीत पडलेल्या खलाशाचा मृतदेह सापडला
रत्नागिरीः घेरा यशवंतगड (ता. राजापूर) येथील समुद्रकिनारी बोटीवरुन खाडीच्या पाण्यात पडून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळला. नाटे सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चैन बहाद्दर कटारिया (वय ३५) असे मृत खलाशाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १६) सकाळी नऊ वाजण्यापूर्वी घेरा यशवंतगड मशिदीचे पुढील बाजूस खाडी किनारी घडली होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कटारिया हे जय भोले नावाच्या मच्छीमारी बोटीच्या पंखा शॉफ्टींगचे काम निघाल्यामुळे बोट डुगेरी जेटी येथे लावून त्याचे काम असताना शनिवारी खाडीच्या पाण्यात पडून बेपत्ता झाले होते. बोटीवरील खलाशी फोरमॅन अमरनाथ कटारिया व इतर सहकारी असा त्याचा शोध घेत असताना घेरायशवंतगड येथे खाडी किनारी त्याचा मृतदेह आढळला.