
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल
यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ
रत्नागिरी, : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आणि माजी उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. “मी राष्ट्राचे एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वत:ला समर्पित करीन, सरदार वल्लभभाई पटेल यांची दूरदृष्टी व कार्यामुळे देशाची एकता राखणे शक्य झाले. तसेच मी माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा अबाधित ठेवण्याकरिता माझे स्वत:चे योगदान देण्याचा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत आहे.” अशी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आज येथील अधिकारी कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) शुभांगी साठे, विशेष भूसंपादन अधिकारी निशाताई कांबळे, प्रांताधिकारी जीवन देसाई, राजश्री मोरे आदिंसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
