
कंत्राटी भरतीचा अध्यादेश महाविकास आघाडी सरकारच्या काळातील: फडणवीस
रत्नागिरी : कंत्राटी भरतीचा अध्यादेश हा महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आहे. मी हे पुराव्यानिशी सिद्ध केले आहे. परंतु जाणीवपूर्वक आमच्या महायुतीच्या सरकारला बदणाम करण्याचा त्यांचा प्रयत्न केला जात आहे. यावर विरोधीपक्षनेते श्री. वडेट्टीवर यांनाच कळत नाही की ते नेमके काय बोलतायत ते म्हणून आम्ही हे उघड केले आणि त्यांची भांडाफोड केली म्हणून आंदोलन केले, असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नाणीज दौऱ्यावर होते. त्यानंतर त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या निवास्थानाला भेट दिली. यावेळी प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.
कंत्राटी भरतीचा निर्णयच महाविकसास आघाडीने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून महाविकसा आघाडी आणि महायुतीच्या सरकारमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. महाविकसा आघडीच्या हे कृत्य पुराव्यानिशी उघड केल्यानंतर भाजपणे त्यांची भांडाफोड केल्याबद्धल अनेक ठिकाणी आंदोलने केली. यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कंत्राटी भरतीचा अध्यादेश महाविकास आघाडी काळातलाच काढण्यात आला होता. पुराव्यानिशी आम्ही हे पुढे आणले आहे. परंतु कंत्राटी भरतीबाबत महायुतीच्या सरकारला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे आघाडी सरकारचे षड्यंत्र आहे. परंतु आम्ही त्याचा पर्दाफाश केला आहे. त्याना उघडे करण्यासाठीच आज भाजपने ठिकठिकाणी आंदोलन केले.
विरोधीपक्षनेते वडट्टीवारांनाच कळत नाही की ते नेमके काय बोलतात त्यांनी समजून घ्यावे नेमके काय बोलावे, एकीकडे ते म्हणातात आमच्या करकारणे केले आणि एकीकडे आमच्यावर आरोप करतात आहेत. आता
जेवढे काळ विरोधक अधिवेशन चालवतील तेवढे आम्ही चालवू, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.