
निकीता कांबळे यांच्या कार्याचा आदर्श महिलांनी घ्यावा…. देवेंद्र पाटील
रत्नागिरी: संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी च्या कोऑर्डिनेटर सौ निकीता जनार्दन कांबळे यांचे कार्य अतुलनीय आहे,गेली 20 वर्षे त्या सामाजिक कार्यात सक्रिय आहेत,मागील 12 वर्षे त्या भाकर संस्थेच्या माध्यमातून काम करीत होत्या,अतिशय प्रामाणिक आणि संकटसमयी गोरगरिबांची सेवा करण्यासाठी त्या कोणत्याही क्षणी तयार असतात, त्यांच्या कार्याची दखल घेवून भारतीय कष्टकरी रयत सेवा संस्था [ भाकर] या संस्थेने रत्नागिरी जिल्ह्यातील अतिशय मानाचा समजला जाणारा अरुणा पुरस्कार हा दिला यातच त्यांच्या कार्याची ही पोचपावती आहे, त्यांच्या कार्याचा आदर्श महिलांनी घ्यावा असे प्रतिपादन भाकर संस्थेचे संस्थापक देवेंद्र पाटील यांनी केले.
रत्नागिरी शासकीय विश्रामगृहात झालेल्या या कार्यक्रमाला सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.भाकर संस्थेच्या 30 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी च्या कोऑर्डिनेटर सौ निकीता जनार्दन कांबळे यांनी आपल्याला हा मिळालेला पुरस्कार मी माझ्या संस्थेला समर्पित करीत असून आता या पुरस्काराने मला नक्की मानसिक पाठबळ मिळाले आहे.
यावेळी सामाजिक कार्यात काम करणा-यांना ही भाकर मित्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, युनियन बँक ऑफ इंडिया चे मुख्य प्रबंधक रावसाहेब सराटे,
भाकर संस्थेच्या अध्यक्षा मंगल पोवार, संस्थेचे पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सोहळ्याला संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे अध्यक्ष शकील गवाणकर, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष निलेश नार्वेकर, रत्नागिरी तालुका अध्यक्ष जमीर खलफे उपस्थित होते.