
मजगाव अंगणवाडी मध्ये पोषण अभियान साजरा
रत्नागिरी : मजगाव ग्रामपंचायत आणि अंगणवाडी मजगाव तर्फे पोषण आहार अभियान साजरा करण्यात आला. या अभियानांतर्गत गावातील महिलांनी विविध पदार्थ तयार करून आणले होते. मान्यवर मंडळीनी तयार पदार्थाची चव घेऊन त्या मधील उत्कृष्ठ पदार्थ ची निवड केली. या कार्यक्रमाच्या. बक्षीस वितरणाला जिल्हापरिषद चे माजी सदस्य. बाबू शेट म्हाप, ना. उदय सामंत यांचे सिविय सहय्यक नेताजी पाटिल, सरपंच फैयाज मुकादम सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, उर्दू शाळा मुख्यद्यापिका, मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गावातील महिलांनी सर्व शासकीय कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.