
मिरजोळे येथून दोन मोबाईल चोरीला
रत्नागिरी : शहरातील मिरजोळे येथील नाचणकर चाळ येथून प्रत्येकी १० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल अज्ञाताने लांबवले.
याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना १ जुलै रोजी दुपारी १२.३० ते २ या कालावधीत घडली. याबाबत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ लक्ष्मण दिनेश थापा याचे रिअलमी आणि नारझो असे दोन मोबाईल अज्ञाताने चोरून नेले. याप्रकरणी बुधवार २६ जुलै रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.