
रत्नागिरीत शाळेच्या आवारात गांजा विक्री करणाऱ्याला अटक
रत्नागिरी : रत्नागिरी शहर पोलिसांनी बाजारपेठ-चर्चरोड येथील एका शाळेच्या आवारात गांजा विक्री करणार्या संशयिताला 30 हजार रुपयांच्या गांजासह अटक केली.
फईम नूरमहम्मद खडकवाले (43, मच्छिमार्केट, रत्नागिरी ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. गुरुवारी रात्री 8.25 वा शहर पोलीस गस्त घालत असताना चर्चरोड येथील 14 नंबर शाळेजवळ पोलिसांना संशयित हा 23 गांजाच्या पुड्यासह मिळून आला. त्याच्याकडे एकूण 1 किलो 488 वजनाचा 30 हजार रुपयांचा गांजा, 60 हजार रुपयांची एक दुचाकी असा एकूण 90 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.