
प्रत्येक ग्रामपंचायतीमधून दोन कर्तबगार महिलांना स्त्री सन्मान पुरस्कार
रत्नागिरी :महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्या महिलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी महिला व बालविकास विभागाने प्रत्येक ग्रामपंचायतीमधून दोन कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जंयतीदिनी 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी महिलांनी स्वतःची वैयक्तिक व केलेल्या कार्याच्या माहितीसह ग्रामपंचायतीकडे 27 मे पर्यंत अर्ज करावा असे जिल्हा प्रशासनाचे वतीने अहवान करण्यात येत आहे.
प्रत्येक गावात पुण्यश्लोक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री सन्मान पुरस्काराने प्रत्येक ग्रामपंचायतीतून दोन कर्तबगार महिलांचा गौरब करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीचे हददीतील राहिवासी असावे. ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्रात महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य असावे. सदर कामाचा कालावधी किमान तीन वर्ष असावा. तसेच महिलांच्या समस्या व प्रश्नाबाबत जाणीव व संवेदना असावी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री सन्मान पुरस्कारासाठी निवड झालेल्या कर्तृत्ववान महिलांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ, तसेच रोख 500 रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे. याम पुरस्कारासाठी ग्रामपंचायत स्तरावर संरपंचाच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक, पोलीस पाटील, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, व आशा सेविका यांची निवड समिती असणार आहे. महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या महिलांनी 27 मे पर्यंत संबधित ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर 28 मे रोजी निवड करुन 31 मे रोजी ग्रामपंचायती कार्यालयामध्ये निवड झालेल्या महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे.
जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये कर्तबगार महिलांचा गौरव होणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले असून याचे माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या कार्याची शासनाने विशेष दखल घेतली आहे, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत हावळे सांगितले. ग्रामीण भागातील महिलांच्या महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या महिलांच्या उल्लेखनीय कार्याची शासनाचे दखल घेऊन त्यांचा गौरव करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे उत्कृष्ठ कार्य करणार्या महिलांचा सन्मान होऊन त्या सामाजिक उपक्रमात अजून सहभागी होतील, असे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी सांगितले.