
अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील शेतकर्यांना मिळणार दोन दुधाळ जनावरांचा गट
रत्नागिरी :अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील शेतकरी लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराद्वारे उत्पादनाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रत्येक लाभार्थ्याला दोन दुधाळ जनावरांचा एक गट 75 टक्के अनुदानावर वाटप योजना जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये प्रत्येक दुधाळ जनावराची किंमत ही सन 2011 मध्ये निश्चित केलेली आहे.
अनुसूचित जाती-जमातीसाठी योजनेची पुनर्रचना करण्यात आली आहे. यानुसार गुरांच्या बाजारामध्ये दुधाळ जनावरांच्या किमतीमध्ये भरमसाट वाढ झाल्याने गाईसाठी 70 हजार रुपये तर म्हशीसाठी 80 हजार रुपयांचे अनुदानात वाढ केली आहे. याबाबतचे निर्देश कृषी पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाच्यावतीने देण्यात आले आहेत.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराद्वारे उत्पादनाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रत्येक लाभार्थीला दोन दुधाळ जनावरांचा एक गट 75 टक्के अनुदानावर वाटप योजना आहे.
या योजनेमध्ये प्रत्येक दुधाळ जनावराची किंमत ही सन 2011 मध्ये निश्चित केलेली आहे. यात आतापर्यंत बदल झालेला नव्हता. सध्याच्या स्थितीमध्ये गुरांच्या बाजारामध्ये दुधाळ जनावरांच्या किमतीत 2011 च्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
योजनेंतर्गत अनुसूचित जाती-जमातीच्या लाभार्थ्यांना दोन दुधाळ जनावरांचा एक गट वाटप करताना गाय गटासाठी 75 टक्के म्हणजेच एक लाख 17 हजार 738 रुपये किंवा म्हैस गटासाठी एक लाख 34 हजार 443 रुपये शासकीय अनुदान देण्यात येणार आहे. या शासकीय योजनेचा लाभ शेतकर्यांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले
आहे.