रत्नागिरीत महाराष्ट्र वकफबोर्डच्या कार्यालयास मंजूरी
४० वर्षाच्या मागणीला उद्योगमंत्री उदयजी सामंत यांनी दिली ४० मिनिटात मंजुरी
रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील गेले कित्त्यक वर्ष वकफ बोर्डचे कार्यालय रत्नागिरी मध्ये व्हावे या ही ईच्छा बाळगणारे रत्नागिरी जिल्ह्यातील मुस्लिम समाजाला आज उद्योग मंत्री उदयजी सामंत यांच्या प्रयत्नाने यश आले. या बाबत अधिक माहिती अशी कि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना मशीद , दर्गा, आधी ट्रस्ट ची नोंदणी करण्यासाठी किंवा कोणतेही बदल करण्यासाठी औरंगाबाद येथे जावे लागत होते. या ठिकाणी एजंट ने थैमान घातले होते. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचे होणारे हाल लक्षात घेता आज रत्नागिरी जिल्ह्यातील मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधी ने ना. उदय सामंत यांची भेट घेतली. ना. सामंत यांनी त्याच क्षणी मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आणि काही क्षणात महाराष्ट्र वकफ बोर्ड च्या रत्नागिरी कार्यालयाला मंजुरी मिळाली. या कार्यालयासाठी लागणारे कार्यालय ही तात्काळ उपलब्ध करून देण्यात आले. रत्नागिरी येते कार्यालय व्हावे या करिता मजगांव सरपंच, शिवसेना विभाग संघटक फैयाज मुकादम, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष शिरगांव उपसरपंच, अल्ताफ संगमेश्वरी, राजापूर शिवसेना तालुका प्रमुख अशफाक हज्जु,माजी नगरसेवक सुहॆल मुकादम, माजी नगरसेवक मूसा काझी, माजी नगरसेवक सुहॆल साखरकर, अझीम चिकटे, उबेद होडेकर, रमजान गोलंदाज,समीर झारी, अल्ताफ काझी, इमरान भाटकर, मुज्जू मुकादम , कोतवडे माजी सरपंच तुफील पटेल , आदिल फणसोपकर, तन्वीर काझी रफिक काझी, सुहॆल लाला, जमूरत अलजी, तैमूर अलजी, उमर धामस्कर, रफिक संसारे, सलाम अलजी, मुखतार तांबू,, पांगरकर, सारंग, दादन, तबरेज सोलकर, नासीर संसारे. बदरू जांभरकर, अब्दुलराहीमन संसारे फारुक संसारे, साजिद, नदीम तमके, नुरुद्दीन कोतवडकर, अब्दुल कोतवडकर, हुसैनमिया कोतवडकर , रियाझ दलाल आदी रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर येथील मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

