Thursday August 20, 2026

रत्नागिरी :मानेज इंटरनॅशनल स्कूल या सी.बी.एस.ई. बोर्डाच्या शाळेमध्ये खास मुलांसाठी आनंदमेळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेमार्फत खास मुलांसाठी व पालकांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा, गमतीशीर खेळ यांचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमांतर्गत तीन ते पाच या वयोगटातील मुलांसाठी बेबी शो, चमचा गोष्टी, चित्रकला, बिस्कीट खाण्याची स्पर्धा, फुगे फोडणे, बेडूक उडी, कविता गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा तर इयत्ता आठवी ते बारावीच्या मुलांसाठी पाककला स्पर्धा घेण्यात आल्या. त्याच बरोबर पालकांसाठी रस्सीखेच, संगीत खुर्ची, रॅम्प वॉक सरप्राईज गेम्स, लकी ड्रॉ चे आयोजन केले गेले.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. इयत्ता सातवी ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थिनींनी हे गीत सादर केले. प्रमुख पाहुणे उद्योजक श्री. सौरभ मलुष्टे, शाळेचे व्यवस्थापक प्रद्युम्न माने, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुमन अरोरा आणि समन्वयिका मुनझ्झा अन्वर मिरकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन झाले. नंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाळेचे व्यवस्थापक श्री प्रद्युम्न माने यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यानंतर विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य आणि कराटे प्रात्यक्षिक सादर करून आपल्या विविध कलागुणांचे प्रदर्शन केले.

यानंतर विविध स्पर्धांना सुरुवात झाली. या विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थी आणि पालक बहुसंख्येने सहभागी झाले. शाळेच्या शिक्षकांनी या स्पर्धांचे परीक्षण केले. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी आणि उपस्थितांसाठी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उपलब्ध करण्यात आले. विविध स्पर्धांमधील यशस्वी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

हा कार्यक्रम व्यवस्थापक प्रद्युम्न माने, मुख्याध्यापिका श्रीमती सुमन अरोरा आणि समन्वयिका मुनझ्झा मिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद यांनी यशस्वीपणे पार पाडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!