कोकणातील मुलांनी , शिक्षकांनी संशोधनाकडे वळावे- ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. अशोक नगरकर
रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळाच्या स्मरणिकेचे प्रकाशन
रत्नागिरी- विज्ञान क्षेत्रात शास्त्रज्ञ व मिसाईल मॅन, भारताचे माजी राष्ट्रपती डाॅ. ए पी जे अब्दुल कलाम यांचे मोलाचे योगदान आहे. विज्ञान माणसांमध्ये परिवर्तन करु शकते. कोकणातील मुलांनी , शिक्षकांनी संशोधनाकडे वळावे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यानी विज्ञान क्षेत्रात भरारी घ्यावी.विद्यार्थ्यांनी महत्वाच्या विषयावर संशोधन केले असेल तर त्याचे पेटंट घेऊन रजिस्ट्रेशन करावे. डाॅ. सी.व्ही. रमण, थाॅमस अल्वा एडिसन, डाॅ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांसारख्या शास्त्रज्ञांची माहिती ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ.अशोक नगरकर यांनी आपल्या मनोगतातून दिली. रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून बुधवारी माध्यमिक शाळा सेवक पतपेढी येथे आयोजित स्मरणिका प्रकाशन व पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी डाॅ. नगरकर बोलत होते.
यावेळी राज्य विज्ञान महामंडळाचे अध्यक्ष दिनेश पवार, डाॅ नगरकर यांच्या पत्नी सौ.सुनिता नगरकर, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, गोपाळ चौधरी, एमकेसीएलचे संतोष कोलते, जिल्हा विज्ञान मंडळाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इनामदार, कार्यवाह प्रभाकर सनगरे, कोषाध्यक्ष मोहन पाटील, उपाध्यक्ष राजू जानकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुदेश कदम, गणपती एडवी, मरीनर दिलीप भाटकर, जुहूर बोट, गणेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड यांनी स्मरणिका प्रकाशन सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील शिक्षकांचे कौतुक केले व या जिल्ह्याचा अभिमान आहे असे सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थी विज्ञान जगत आहेत.
राज्य विज्ञान महामंडळाचे अध्यक्ष दिनेश पवार यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे मंडळ महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे आहे. कोविड काळातील ऑनलाईन शिक्षण हा एक विज्ञानाचा भाग आहे. विज्ञान व तंत्रज्ञान मुळे मानवाची प्रगती केली. शिक्षक चांगले विद्यार्थी घडवेल तेव्हा विद्यार्थी नाविन्यपूर्ण संशोधनाकडे वळतील. एखाद्या कल्पनेला मूर्त रुप देण्याचे काम विज्ञान शिक्षकांनी करावे. जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र इनामदार यांनी मंडळाला गेली २५ वर्ष अनेकांनी सहकार्य केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. एमपीएससी युपीएससी सारख्या परीक्षेतही रत्नागिरीतील विद्यार्थ्यानी पुढे यावे. पर्यावरण विषयक काम रत्नागिरी जिल्ह्यात व्हावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात मान्यवरांचा, राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त
शिक्षकांचा, विज्ञान शिक्षक व विज्ञान मंडळासाठी योगदान देणाऱ्यांचा कृतज्ञता सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा, जिल्हास्तरीय विज्ञान छंद मंडळ स्पर्धा यांचे बक्षीस वितरण व विज्ञान मित्र पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत पाकळे , श्रीधर जोशी यांनी तर राजेंद्रकुमार कुंभार यांनी आभार मानले. स्मरणिकेसाठी सुदेश कदम, गणेश कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले.