विजय संकल्प मेळावा रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आगामी विजया साठी व्यूहरचना ठरेल :-दीपक पटवर्धन
रत्नागिरी :शनिवार दिनांक 15 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता स्वयंवर मंगल कार्यालय रत्नागिरी येथे होणारा भाजपा विजय संकल्प मेळावा ना.रवींद्र चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाने सर्व कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. विजयाचा संकल्प करणारा हा मेळावा भाजपा च्या आगामी यशदायी वाटचालीचा रोड मॅप निश्चित करणारा असेल.
रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यातील 4 तालुक्यातील बूथ स्तरा पर्यंत चे कार्यकर्ते, नेते या मेळाव्यास उपस्थीत असतील. मेळाव्या साठी सर्व पदाधिकारी मेहनत घेत असून मोठी उपस्थिती या मेळाव्यास राजकीय यश देऊन जाईल.
ना.रवींद्र चव्हाण साहेबांचं मार्गदर्शन हा या मेळाव्याचा केंद्र बिंदू असेल.
विजय संकल्प मेळाव्याची तयारी अंतिम टप्यात असून शहरामध्ये मेळाव्याची होर्डिंग्ज लागली असून कार्यकर्त्यांना निमंत्रणे देण्यासाठी आपापल्या मांडला मध्ये तालुका अध्यक्ष व त्यांची टीम काम करत आहे.
सर्व भाजपा कार्यकर्ते ,नेते या सर्वांनी या विजय संकल्प मेळाव्यात उपस्थित राहून चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अध्यक्ष दिपक पटवर्धन यांनी केले आहे.