नव्या शैक्षणिक धोरणानुसार बीएड अभ्यासक्रमात होणार बदल
रत्नागिरी :राज्यात येत्या शैक्षणिक वर्षापासून नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या पार्वभूमीवर प्रत्येक शिक्षक हा दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असावा, यासाठी शिक्षक होण्यासाठी बीए अभ्यासक्रमात बदल केला जाणार आहे, तर दुसरीकडे बारावीनंतरचा डीएड अभ्यासक्रम कालबाह्य होणार असून त्यासाठीची प्रक्रिया सुरू असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
नव्या शैक्षणिक धोरणाच्या पार्वभूमीवर शिक्षकांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी वर्ष 2030 पर्यंत महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये शिक्षण विभाग स्थापन करण्याची शिफारस राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात करण्यात आली आहे. तसेच या विभागामार्फत शिक्षणशास्त्र पदवी (बीएड), शिक्षणशास्त्र निष्णात पदवी (एमएड), आणि शिक्षणशास्त्रातील विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी देण रे अभ्यासक्रम तयार केले जाणार आहेत. त्यामुळे डॉक्टर, इंजिनियरींगच्या अभ्यासक्रमाप्रमाणे शिक्षक होण्यासाठी बारावीनंतर शिक्षणशास्त्र विषय घेऊन किमान चार वर्षांचा बीएड अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. येत्या काळात शिक्षक बनण्यासाठी बीएड अभ्यासक्रम नव्या रूपात येणार आहे.
शिक्षणशास्त्र या विषयासोबत यात विस्तृत ज्ञान आशय ( थेअरी), विशेष विषय आणि भरीव प्रात्यक्षिक कार्य (प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिकविणे) यांचा समावेश असणार आहे. विद्यार्थ्यांना चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शेवटच्या सत्रात ज्या क्षेत्रात आवड आहे. त्यासंबंधीची सहा महिनेप्रेटायझ्ोशन, इंटर्नशिप करावी लागेल. यानंतर विद्यार्थी शिक्षक म्हणून नोकरीकरण्यासाठी पूर्णपणे तयार होतील. बारावीनंतर नव्याने पदवीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा पॅटर्न लागू होणार आहे.