
ना. उदय सामंत यांच्या हस्ते २६४ कोटींच्या रत्नागिरी औद्योगिक क्षेत्र अनिवासी अंतर्गत इमारतीसह अतिथीगृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन
रत्नागिरी: औद्योगिक क्षेत्रात सुवर्ण अक्षराने लिहला जाणारा आजचा ना.उदय सामंत यांच्या हस्ते २६४ कोटीच्या रत्नागिरी औद्योगिक क्षेत्र अनिवासी अंतर्गत इमारत व अतिथीगृहाचे बांधकामाचे भूमिपूजन आहे.रत्नागिरीच्या औद्योगिक क्षेत्रात भर पडणारा हा ऐतिहासिक निर्णय आहे.या नूतन इमारतीमुळे औद्योगिक क्षेत्रात रत्नागिरीमध्ये काम करण्यासाठी आणि येणाऱ्या नवीन उद्योजकांना आपल्याला कामासाठी उपयुक्त ठरनारी महाराष्ट्र मधील औद्योगिक क्षेत्रातील ही इमारत असणार असल्याचे उल्लेख ना.उदय सामंत यांनी केला आहे.
सदरील इमारत 264 कोटी असुन लवकरच या कामाला सुरवात होणार आहे.यावेळी डॉ.विपीन शर्मा,जिल्हाधिकारी देवेद्र सिंग,सुभाष तुपे,मुख्य अभियंता (म.औविम), कालिदास भांडेकर अधीक्षक अभियंता,राहुल पंडित, तालुकाप्रमुख बाबू म्हाप,प्रशांत पटवर्धन,महिला जिल्हा संघटक शिल्पा सुर्वे, युवा तालुका अधिकारी तुषार साळवी,आदी उपस्थित होते.
