
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्राध्यापकांसाठी कार्यशाळा
रत्नागिरी:- गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात ३ ते ५ एप्रिल या कालावधीत महाविद्यालयीन प्राध्यापकांसाठी तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे.
कार्यशाळेसाठी एमएसएफडीए (महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकादमी) यांचे सहकार्य लाभले आहे. आय. आय. एस. इ. आर., पुणे या संस्थेतील तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत. आगामी शैक्षणिक वर्षात येणारे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, वर्गात शिकविण्याच्या विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणाऱ्या नवनवीन पद्धती, कृती केंद्रित अभ्यासपद्धती, वर्गातील तसेच प्रयोगशाळेतील प्रभावी देवाणघेवाणीसाठी आवश्यक असलेल्या नवीन पद्धती, मूल्यमापनाच्या नाविन्यपूर्ण पद्धती यासर्वांबाबत या कार्यशाळेत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.