
पीठ गिरणीच्या पट्ट्यात पाय अडकून जखमी गिरणी मालकाचा उपचारादरम्यान मृत्यू
रत्नागिरी : श्रीराम आळीतील पीठ गिरणी चे मालक “अनिल भार्गव पोटफोडे” यांचा काल सायंकाळी ७ : ०० वा. चे दरम्यान पीठ गिरणीच्या पट्ट्यात पाय अडकून अपघात झाला होता.
त्यांना प्रथम सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते, परंतु पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे नेण्यात आले होते. रात्री १२ : ०० चे सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
पिढीजात पिठगिरणीचा व्यवसाय करणारे श्रीराम मंदिर देवस्थान चे मानकरी अत्यन्त प्रेमळ सर्वांच्या मदतीला धावून जाणारे आणि कष्टी असे व्यक्तिमत्त्व अशा प्रकारे अचानक अपघाती मृत्यूने निघून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून बाजारपेठेवर शोककळा पसरली आहे.