शेवंड मासे विकत घेऊन पुन्हा सोडले समुद्रात
दापोलीः– हर्णे बंदर येथील जयदास चौगले व मज्जिद महालदार यांनी कोळ्यांच्या जाळ्यात सापडून आलेले शेवंड मासे विकत घेऊन पुन्हा ते समुद्रा सोडले. त्यांच्या या कृतीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शेवंड हा मासा सध्या दुर्मिळ होत चालला आहे. यामुळे या माशाला मोठी किंमत असते. या माशांची परदेशात देखील मोठया प्रमाणात निर्यात होते. हा मासा दुर्मिळ होत चालल्याने याची किंमत देखील वाढली आहे. दीड हजार ते दोन हजार रूपये किलो एवढया महाग रकमेला हा मासा विकला जातो. दापोली तालुक्यातील हर्णे येथे मत्स्य व्यवसाय असलम अकबानी हे गेली कित्येक वर्ष त्यांच्या सेंटरवर येणारे कोळी बांधवांकडून येणारे शेवंड मासे हे विक्री न करता ते पुन्हा समुद्रात सोडतात. त्यांना होणाऱ्या पैशाची अपेक्षा न करता ते कित्येक वर्ष हे काम करत आलेले आहेत. यामुळे त्यांना आर्थिक नुकसान देखील सोसावे लागते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन जयदास चौगले व मज्जिद महालदार यांनी देखील बुधवारी त्यांच्या हर्णै येथील शेवंड मासे विकत घेऊत ते पुन्हा समुद्रात सोडले. त्यांच्या या कृतीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.