पुनस येथे कार अपघातात तरुण जखमी
लांजा : दुचाकीस्वाराला वाचवताना
कार खड्ड्यात कलंडून अपघात झाल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर पुनस फाट्यासमोर घडली. यामध्ये दुचाकीस्वाराच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले.
ने वैभव हनमंत पालेकर (४३, रा.सुकापूर नवीन पनवेल, ता.जि. रायगड) हे कार (एमएच.०६. सीडी.१८१०) पनवेल ते तारकर्ली असे जात होते, त्यांच्यासोबत पत्नी व मुलगा होता. दरम्यान, देवधे फाटा येथे कार आली असता प्रमोद प्रभाकर भुते (५२, रा. मांडवी बंदररोड रत्नागिरी, ता.जि. रत्नागिरी) व पत्नी पूजा प्रमोद भुते ४९) हे (एमएच.०८. बीबी.९५४१) दुचाकीने मुंबई-गोवा महामार्गालगत पुनस फाट्यावरून रस्त्याच्या पलीकडे देवधे फाटा येथे आत जात होते.
ही दुचाकी महामार्गावर कारच्या समोर अचानक आल्याने त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात कार महामार्गा लगतच्या खड्ड्यात जाऊन कलंडली. यामध्ये कारचालक यांची पत्नी किरकोळ जखमी झाली. तर दुचाकीस्वार प्रमोद भुते यांच्या डोक्याला मार लागून ते जखमी झाल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.