उपचारापूर्वीच ८० वर्षीय रत्नागिरीतील महिलेचा मृत्यू
रत्नागिरी
अचानक उलटीसारखे वाटून श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने बेशुद्ध पडलेल्या ८० वर्षीय वृद्ध महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरीत घडली. मधुमती मधुकर पंडीत (वय ८०, रा. भागीरथी भवन, खालची आळी, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मधुमती पंडीत यांना अचानक उलटीसारखे वाटू लागले. त्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्या बेशुद्ध पडल्या. त्यांची प्रकृती खालावल्याने मुलगी विजया राजेश पूंडे यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता ११ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे २.२९ वाजता त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मुलगी विजया पूंडे यांनी दिल्यानंतर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ४७/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. वृद्ध महिलेच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.