झाडगाव नाका येथे घरातील फ्रिज कॉम्प्रेसरचा स्फोट
रत्नागिरी : शहरातील झाडगाव नाका परिसरातील अभय पटवर्धन यांच्या घरातील फ्रिजच्या कॉ म्प्रेसरचा अचानक जोरदार स्फोट होऊन. फ्रिजने पेट घेतला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.
मोठा आवाज व आगीचे लोळ पाहून घरात एकच तारांबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेचे अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी रवाना झाले. मात्र, अग्निशामक बंब झाडगाव येथे घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच पटवर्धन कुटुंबियांनी विलक्षण प्रसंगावधान दाखवले.
त्यांनी तात्काळ पाण्याचा मारा करून आग स्वतःच आटोक्यात आणली. कुटुंबियांच्या या समयसूचकतेमुळे आग संपूर्ण घरात पसरण्यापासून रोखली गेली आणि संभाव्य दुर्घटना टळली. या दुर्घटनेत फ्रिजचे पूर्णपणे नुकसान झाले असून स्वयंपाक घरातील थोडे पटवर्धन यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेत कोणतीही जीवित हानी किंवा कोणालाही दुखापत झालेली नाही.