तोल जावून पडलेल्या प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी ः मद्याच्या नशेत तोल जावून पडलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत गोषित केले. राजन तनुज बेहेरा (वय ५५, रा. ओडिसा राज्य सध्या. मिरजोळे एमआयडीसी रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १७) रात्री साडे अकराच्या सुमारास मिरजोळे एमआयडीसी येथे घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित हा दारुच्या नशेत तोल जावून बेशुद्ध पडला. तात्काळ त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले त्यांच्यावर सुरु असताना शनिवारी (ता. २४) तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.