सार्वजनिक ठिकाणी मद्यपान ; दोघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः शहरातील चंपक मैदान व हातखंबा बोंबलेवाडी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या दोघा संशयितांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष यशवंत मयेकर (वय ५२, रा. काळबादेवी, मयेकरवाडी, रत्नागिरी) व प्रशांत अनंत गावडे (वय २९, भोके आंबेकरवाडी, रत्नागिरी) असे संशयितांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयितांकडे मद्यपान करण्याचा परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत बंडबे, आशिष रहाटे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.