कोकण विभागात ९६.१ टक्के पावसाची नोंद
रत्नागिरी: यंदाच्या मान्सून हंगामात कोकण विभागात पावसाचे संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. मान्सूनच्या आकडेवारीनुसार रायगड, ठाणे आणि पालघर या उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार घोडदौड करत गतवर्षीच्या तुलनेत अधिक पावसाची नोंद केली आहे.
दुसरीकडे दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मात्र यंदा पावसाने काहीशी पाठ फिरवल्याने गतवर्षाच्या तुलनेत तूट निर्माण झाली आहे. संपूर्ण कोकण विभागाचा विचार करता विभागात २,५८०.२ मिमी या सरासरीच्या तुलनेत २,४७९.५ मिमी म्हणजेच ९६.१ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
ठाणे जिल्ह्यात अपेक्षित २,१७४.३ मिमी सरासरीच्या तुलनेत तब्बल २,३२०.१ मिमी म्हणजेच १०६.७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी या काळात २,१८७.९ मिमी (१००.६ टक्के) पाऊस झाला होता. यामध्ये अंबरनाथ तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच १२९.५ टक्के (२,२५३.२ मिमी) पाऊस झाला. त्यापाठोपाठ उल्हासनगर (१२३.० टक्के),
रायगडमध्ये १२.५ टक्के अधिक पाऊस
रायगड जिल्ह्यात २२ सप्टेंबर २०२६ पर्यंत २८७१.२ मिमी म्हणजेच सरासरीच्या ९४.५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच काळात २४९३.२ मिमी (८२.० टक्के) पाऊस झाला होता, म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल १२.५ टक्के अधिक पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पाहता उरण तालुक्याने सर्वाधिक १३९.२ टक्के (२७३४.० मिमी) पावसासह प्रथम क्रमांक पटकावला आहे.