मुर्तवडे सुतारवाडीत युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
चिपळूण: तालुक्यातील मुर्तवडे सुतारवाडी येथे घरातील पडवीत लाकडी भालाला नायलॉनची रस्सी बांधून गळफास घेतल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गुरुनाथ दत्ताराम पांचाळ (वय ४३, रा. मुर्तवडे सुतारवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू (आमृ. क्रमांक २०/२०२६, बीएनएसएस १९४ प्रमाणे) नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत गुरुनाथ पांचाळ यांचे चलत भाऊ कौस्तुभ कान्होबा पांचाळ यांनी या घटनेची खबर दिली आहे. ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मुर्तवडे सुतारवाडी येथील घरातील पडवीमध्ये गुरुनाथ पांचाळ यांनी लाकडी भालाला नायलॉनची रस्सी बांधून स्वतः गळफास लावून घेतला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली असून, ११ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमागील नेमक्या कारणाचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.