नवनिर्माण हॉटेल मॅनेजमेंट डिपार्टमेंटच्या मोदक मेनियाला भरघोस प्रतिसादमोदक मेनिया स्पर्धा आणि प्रदर्शन
रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी येथील एस पी हेगशेट्ये महाविद्यालयातील हॉटेल मॅनेजमेंट विभागाकडून आयोजित केलेल्या मोदक मेनिया मोदक स्पर्धा आणि प्रदर्शनाला महाविद्यालयातून भरघोस प्रतिसाद मिळाला. आज सर्वत्र गणेश उत्सवाची तयारी आणि गणेशोत्सव निमित्ताने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हॉटेल मॅनेजमेंट विभागतर्फे मोदक मेनिया मोदक कॉम्पिटिशन चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी महाविद्यालयातील असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये गणपती बाप्पांना आवडणारे विविध चवी विविध रंग आणि विविध प्रकारच्या सजावटी असणारे मोदक बनविण्यात आले. विशेष करून हेल्दी मिलेट मोदक, शुगर फ्री दुधी भोपळा मोदक, उकडीचे पान फ्लेवर मोदक, कोकणी स्पेशल मोदक, नाचणी ड्रायफ्रूट मोदक अशा विविध फ्लेवर्सचे मोदक विद्यार्थ्यांनी बनवले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक साक्षी पाटील आणि संगीता नारकर यांना विभागून देण्यात आला., द्वितीय क्रमांक श्रावणी मयेकर आणि तृतीय क्रमांक सोहन घावळी यांनी प्राप्त केला. त्याचबरोबर सार्थक शिंदे आणि दिशी कदम यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.
या स्पर्धेचे स्पर्धेचे परीक्षण मोदक स्पेशालिस्ट अनेक वर्षे या क्षेत्रात कार्यरत असलेले मुग्धा चव्हाण आणि नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या संचालिका सीमा हेगशेट्ये यांनी केले. स्पर्धेतील विजयी स्पर्धाकांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
हॉटेल मॅनेजमेंट विभागाकडून आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये बहुसंख्य विद्यार्थी सहभागी झाले त्याचबरोबर संस्थेच्या नवनिर्माण हाय, एस पी हेगशेट्ये महाविद्यालय जुनिअर कॉलेज आणि फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला