सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात गुन्हा
रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील पाली येथील उघड्या मैदानात सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.30 वा.सुमारास करण्यात आली.
अमोल दत्ताराम ताम्हणकर (40,रा.कशेळी ताम्हणकरवाडी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस कर्मचारी सुर्याजी पाटील यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी सायंकाळी संशयित हा पाली येथील बालाजी हॉटेल समोरील मोकळ्या मैदानात आपल्याकडे दारु पिण्याचा कोणताही परवाना नसताना दारु पित असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 84 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.