वाहतुकीला अडथळा करणाऱ्या तीन चालकांविरोधात गुन्हा
रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरानजीकच्या कारवांचीवाडी फाटा ते खेडशी जाणाऱ्या रस्त्यावर इतर वाहनांच्या वाहतुकीला अडथळा व धोका निर्माण होईल अशा पध्दतीने वाहने उभी केली. याप्रकरणी तीन चालकांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार 7 सप्टेंबर रोजी रात्री 8 ते 8.25 वा.कालावधीत करण्यात आली.
रघूनाथ उल्लेश खोत (30,रा.कारवांचीवाडी,रत्नागिरी) याने आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एवाय-5470), दिनेश दिलीप शिंदे (39,रा.कारवांचीवाडी,रत्नागिरी) याने आपल्या ताब्यातील कार (एमएच-08-आर-2470) तर नईम मुन्नावर पटेल (26,रा.कुवारबाव,रत्नागिरी) याने आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एव्ही-6722) ही कारवांचीवाडी फाटा ते खेडशी जाणाऱ्या रस्त्यावर इतर वाहनांना येण्या जाण्यास अडथळा व धोका निर्माण होईल अशा स्थितीत उभ्या केल्या होत्या. त्यांच्या विरोधात भारतीय न्यास संहिता अधिनियम 2023 चे कलम 285 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.