संगमेश्वर बाजारपेठेत 6 चालकांवर गुन्हे दाखल
संगमेश्वर : बाजारपेठेसह मुख्य रस्त्यांवर वाढत्या वाहतूक कोंडीला आळा
घालण्यासाठी संगमेश्वर पोलिसांच्या वतीने बेकायदेशीर व धोकादायक वाहने उभी करणाऱ्या चालकांविरोधात कारवाई केली आहे. २७ ते २९ ऑगस्ट दरम्यान ६ वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस अडथळा करणाऱ्या ३ वाहनचालकांवर २७ रोजी रात्री गुन्हे दाखल करण्यात आले. ही पहिली कारवाई बाजारपेठेत केली गेली. या ठिकाणी नीलेश नामदेव चव्हाण (वय ४०, रा. चव्हाणवाडी, कोळंबे) याने टेम्पो अयोग्य पद्धतीने उभा केला होता. देवरूख रस्त्यावर दिनेश मधुकर कांबळे (वय ३४, रा. शाहूवाडी, कोल्हापूर) याने पिकअप वाहतुकीस अडथळा ठरेल अशी पार्क केली होती. तसेच, याच ठिकाणी मोटार बेजबाबदारपणे उभी केलेली होती. या प्रकरणी अयुब सरदार कतनळी (वयं ५०, रा. संगमेश्वर) याच्यावर तिसरी कारवाई पोलिसांनी केली. २८ ऑगस्टला सायंकाळी देवरूख रस्त्यावर बसस्थानकासमोर दुसरी कारवाई केली. तिथे मोटार रस्त्यावर उभी केलेली होती. याप्रकरणी अमित श्रीपाद सावंत (वय ४५, रा. माभळे पुनर्वसन) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. २९ ला सार्यकाळी ५.३० वाजेच्या सुमारास बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर दोन रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. यात रिक्षाचालक संतोष धर्मा जाधव (वय ४६, रा. माथन्ले) आणि चालक जहीर सलीम मापारी (वय ४०, रा. कोडअसुडें) यांचा समावेश आहे. या दोन्ही रिक्षाचालकांवर पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत.