धाऊलवल्ली येथे रस्त्यावर अचानक गाडीसमोर बिबट्या; वाहनचालकाची तारांबळ
राजापूर : राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली परिसरा तील नाटे येथील रस्त्यावर अचानक गाडीसमोर बिबट्या आल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली. बिबट्या रस्त्यावरून जात असल्याचे दिसताच काही वाहनचालकांनी वाहने थांबवून सुरक्षित अंतरावरून त्याच्याकडे पाहिले.
बिबट्या अचानक रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना सावधपणे वाहने चालवावी लागली. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
दरम्यान, वनविभागाने या परिसरात बिबट्याच्या हालचालींबाबत पाहणी करून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे. रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.