स्वातंत्र्यदिन उत्साहात, सामाजिक भान जपत! एकता रत्नागिरी जिल्हा टू व्हिलर मेकॅनिक असोसिएशनचा विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम
रत्नागिरी – भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एकता रत्नागिरी जिल्हा टू व्हिलर मेकॅनिक असोसिएशन – टिम रत्नागिरी यांच्या वतीने जिल्हा परिषद केंद्रीय शाळा, ओरी क्रमांक – १, ता. जि. रत्नागिरी येथे विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपत विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना जिलेबी, बटाटा वडा, चिक्की, चॉकलेट तसेच शैक्षणिक साहित्याची छोटीशी भेटवस्तू देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासोबतच त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
तसेच शाळेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू व होतकरू दोन विद्यार्थिनींना दफ्तर, वह्या, कंपास बॉक्स तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य देऊन शैक्षणिक मदतीचा हात पुढे करण्यात आला.
एकता रत्नागिरी जिल्हा टू व्हिलर मेकॅनिक असोसिएशन – टिम रत्नागिरी यांच्या वतीनेन गेली कित्येक वर्षे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा केला जातो. जिलेबी, खाऊ तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करून “समाजाने समाजासाठी काहीतरी करावे” या भावनेतून हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, ग्रामस्थ, पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकता रत्नागिरी जिल्हा टू व्हिलर मेकॅनिक असोसिएशन – टिम रत्नागिरीचे प्रमुख पदाधिकारी व सदस्य यांचीही उपस्थिती लाभली.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी मिळालेली ही छोटीशी मदत, हेच या उपक्रमाचे खरे समाधान आहे.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्री . महेश पालकर, श्री. समीर शेट्ये, धनंजय कदम, गणपत वेदरे, बावा शिवलकर, जितेंद्र भूते, दिलीप शिंदे, धनंजय कदम, गणेश शेंडे ह्या सर्व असोसिएशन सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्वांच्या सहकार्यामुळेच सामाजिक बांधिलकीचा हा उपक्रम उत्साहात आणि आनंदात पार पडला.