रिक्षाची दुचाकीला धडक ; रिक्षा चालकासह दोन महिला जखमी
रत्नागिरी
शहराजवळील नाचणे ते नारायणमळी जाणाऱ्या रस्त्यावर रिक्षाने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये तिघेजण जखमी झाले. शहर पोलिस ठाण्यात संशयित रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्र दत्तात्रय कुर्टे (वय ५३, रा. आंबेशेत, कुर्टेवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ५) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास नाचणे ते नारायणमळी असे जाणाऱ्या रस्त्यावर कोहिनूर एनक्लेव या अपार्टमेंच्या समोर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित राजेंद्र कुर्टे हा रिक्षा (क्र. एमएच-०८ इ ४१६६) सोबत त्याची पत्नी सौ. श्रृती कुर्टे हिस घेवून नाचणे नारायणमळी मार्गे आंबेशेत येथे जात होता. रिक्षा निष्काळपणे चालविल्यामुळे रिक्षाच्या पुढे जाणाऱी दुचाकी (क्र. एमएच-०८ एवाय ३६६६) वरिल अन्वी अमेय घोसाळे यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात. अन्वी घोसाळे यांनी गंभीर दुखापत झाली तर रिक्षातील सौ. श्रृती कुर्टे व रिक्षा चालक राजेंद्र कुर्टे यांना दुखापत झाली. या प्रकरणी फिर्यादी आशिष अरुण घोसाळे (वय ४४, रा. घोसाळेवाडी, आंबेशेत, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.