गोळप-फिनोलेक्स कॉटेज येथे घरफोडी; ९ लाखाचा ऐवज लंपास
रत्नागिरी: तालुक्यातील गोळप येथील फिनोलेक्स कॉटेज परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण ९ लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली आहे.
ही टना २६ जुलै रात्री ८ ते २७ रोजी मध्यरात्री एक च्या दरम्यान घडली. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित घर बंद असल्याचा फायदा उठवत चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटातील रोख रक्कम आणि मौल्यवान दागिने असा एकूण ९ लाखाचा ऐवज लंपास करुन चोरटे पसार झाले २७ जुलै ला मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
या घटनेची माहिती मिळात पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात अद्यापही सुरु आहे.