रिळ येथे वृद्धाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः झोपलेल्या वृद्धाला जेवणासाठी आवाज दिला असता त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही नातेवाईकांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र खंडाळा येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. अरुण तुकाराम चव्हाण (वय ८०, रा. रिळ, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २२) रात्री नऊच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्र खंडाळा येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अरुण चव्हाण यांना गेली पाच वर्षापासून बीपी, हार्टअटॅकचा त्रास सुरु होता. रत्नागिरी खासगी रुग्णालयातून त्यांच्या उपचार सुरु होते. मंगळवारी ते झोपलेले असताना जेवणासाठी आवाज दिला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही नातेवाई त्यांना खंडाळा येथील आरोग्य केद्रात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.