मारहाण प्रकरणी दुचाकी चालका विरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी ः प्रतिनिधी
किरकोळ कारणातून रिक्षा चालकाला जबर मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना बुधवार 15 जुलै रोजी सकाळी 11.30 वा.सुमारास आठडा बाजार ते पटवर्धन हायस्कुलकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर घडली होती.
मनिष बळीराम कुवळेकर (रा.चवंडेवठार,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात मिलिंद मुरलीधर भाटकर (51,रा.पेठकिल्ला,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी सकाळी ते आपला नातू रियांश सुर्वे याला शाळेत सोडण्यासाठी आपल्या ताब्याती रिक्षा (एमएच-08-एव्ही-7453) घेउन जात होते. ते आठवडा बाजार ते पटवर्धन हायस्कुलकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर आले असता समोरुन एक चार चाकी वाहन आल्यामुळे त्यांनी आपली रिक्षा मागे घेतली. त्यावेळी रिक्षाच्या मागे संशयित मनिष कुवळेकर हा दुचाकीवर असताना त्याला या गोष्टीचा राग आला. त्यामुळे त्याने फिर्यादीला शिवीगाळ करत हातांच्या ठोशांनी त्याच्या तोंडावर व डोळ्यावर डाव्या बाजूस जबर मारहाण केली. त्यामुळे फिर्यादी ओठाला बाहेरील व आतीस बाजूस टाके पडून डोळयाने कमी दिसू लागले आहे.