पोमेंडी बोगद्यात रेल्वेतून पडून नेपाळी तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील पोमेंडी गावातील रेल्वे बोगद्यामध्ये नेपाळी तरुणाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला. ही घटना शनिवार 11 जुलै रोजी सकाळी 9 वा.सुमारास निदर्शनास आली.
सादिक अली सिध्दीकी (32,मुळ रा.नेपाळ) असे रल्वेतून पडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सादिक हा शनिवारी रेल्वेने प्रवास करत असताना सकाळी 9 वा.सुमारास पोमेंडी गावातील रेल्वे बोद्यात रेल्वेतून तो खाली पडला. रेल्वे त्याच्या शरिरावरुन गेल्याने त्याचे धडव डोके वेगळे होउन त्याचा मृत्यू झाला. याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.