सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये पहिली पालक-शिक्षक संघाची सभा संपन्न
रत्नागिरी, : सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूल, रत्नागिरी येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ ची पहिली पालक-शिक्षक संघाची सभा उत्साहात संपन्न झाली. यावेळी व्यवस्थापिका सिस्टर अफ्रा, मुख्याध्यापिका सिस्टर जॉयलेट परेरा, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सिस्टर कविता, शिक्षक व पालक प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. माजी पर्यवेक्षिका सिस्टर ॲन आणि माजी प्राथमिक मुख्याध्यापिका सिस्टर सुनीता यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच नवनियुक्त प्राथमिक मुख्याध्यापिका सिस्टर कविता यांचे स्वागत करण्यात आले.
सभेत पालक-शिक्षक संघाची उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आली आणि शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी नवीन कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली. हायस्कूल विभागाच्या PTA कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी सिस्टर जॉयलेट परेरा, सचिवपदी शिक्षिका अरिका तांडेल, खजिनदारपदी शिक्षिका अनुष्का धुपकर, सहसचिवपदी अस्मा गोलंदाज आणि सहखजिनदारपदी मनोज गमरे यांची निवड करण्यात आली.
पालकांनी शाळेच्या प्रगतीसाठी मौल्यवान सूचना मांडल्या. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला.