दूषित आणि रासायनिक पाण्याबाबत युवक क्रांती सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
रत्नागिरी : शहरातील मिरजोळे एमआयडीसी येथील काही बेजबाबदार रासायनिक कंपन्यांकडून प्रक्रिया न केलेले घातक आणि विषारी सांडपाणी चोरट्या मार्गाने स्थानिक नैसर्गिक वहाळांमध्ये सोडले जात आहे हेच दूषित पाणी पुढे जाऊन मिरजोळी गावातील मुख्य नदी पात्रात मिसळत असून स्थानिक नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारा हा गंभीर प्रकार आहे, हे मा जिल्हाधिकारी यांचे निदर्शनास आणून दिले,याबाबतीत युवा क्रांती सेनेने माननीय जिल्हाधिकारी,माननीय प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि माननीय पोलीस अधीक्षक रत्नागिरी जिल्हा यांना एक निवेदन सादर केले असून प्रशासनाने सात दिवसांच्या आत या कंपन्यांवर प्रत्यक्ष कारवाई न केल्यास स्थानिक ग्रामस्थांसह युवा क्रांती सेना जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन छेडेल, असे या निवेदनात म्हटले आहे. सदरचे निवेदन युवा क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष जुनेद बंदरकर,कार्याध्यक्ष सचिन शिंदे, सरचिटणीस शकील गवाणकर संपदा राणा, बिस्मिल्ला नदाफ आदी मुख्य कार्यकर्ते यांनी हे निवेदन दिले आहे