सुभान तांबोळी यांची रत्नागिरी शहर अध्यक्षपदी निवड
रत्नागिरी: जिल्ह्यात सातत्याने सामाजिक कार्य करणारे, रात्रीअपरात्री अडचणीत सापडलेल्या गरजूना मदतीसाठी धावणारे सुभान तांबोळी यांची संपर्क युनिक फाउंडेशन रत्नागिरी या संस्थेच्या रत्नागिरी शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली. संस्थेच्या झालेल्या सभेत सर्व सभासदांनी सुभान तांबोळी यांची निवड केली. गेली आठ वर्षे संपर्क युनिक फाउंडेशन सातत्याने सामाजिक कार्य करीत आहे सुभान तांबोळी सारख्या सक्रिय सामाजिक कार्यकर्त्या ला त्यांच्या कार्याची दखल घेऊन संपर्क युनिक फाउंडेशनने सुभान तांबोळी यांचे वर रत्नागिरी शहर व परिसर याची जबाबदारी सोपविली आहे. निवड झाल्यानंतर सुभान तांबोळी यांनी संस्थेचे आभार मानत आपण संस्थेच्या वतीने अनेक विविध कार्यक्रम घेऊ आणि संस्थेने दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरू असे अभिवचन दिले सुभान तांबोळी यांच्या निवडीने विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. सुभान तांबोळी यांना संस्थेचे अध्यक्ष शकील गवाणकर यांनी निवड पत्र देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या