महिलाच्या डोक्याच्या मागील बाजूस कोयतीने वार ; संशयिताविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः महिलेला शिवीगाळ करुन कोयती डोक्याच्या मागील मारुन जखमी करणाऱ्या संशयिताविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल रामजी कांबळे (रा. आगरनरळ , रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता.१३) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास आगरनरळ-बौद्धवाडी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सुनिल रामजी कांबळे (वय ५५, रा. आगरनरळ, रत्नागिरी) यांचा मोठा भाऊ हा त्यांचे घरासमोरील जागेत जंगली झाडाझुडपाचे कंपाऊंड करत होता. त्यावेळेस फिर्यादी यांच्या पत्नी सुनिता सुनिल कांबळे यांनी तुम्ही आमच्या घरासमोर कंपाऊंड करुन नका असे सांगितले याचा राग मनात धरुन संशयित अनिल कांबळे यांने कोयती फिर्यादी यांची पत्नी सुनिता हिच्या डोक्याच्या मागील बाजूस मारुन जखमी केले. या प्रकरणी सुनिल कांबळे यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिता विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.