प्रभाग १५ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा
नगरसेवक अमित विलणकर यांचा अभिनव उपक्रम
रत्नागिरी: रत्नागिरी नगर परिषदेचे नगरसेवक अमित वसंत विलणकर यांच्या पुढाकाराने आणि नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग क्र. १५ मधील इयत्ता १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.
शुक्रवार, दिनांक ०५ जून रोजी आयोजित या कार्यक्रमात शैक्षणिक वर्षात उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या सुमारे ६० विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे स्वरूप यंदा अधिक व्यापक करण्यात आले होते. विशेष म्हणजे, जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मान्यवरांचे स्वागत वृक्षरोपे देऊन करण्यात आले, हा उपक्रमाचा एक आगळावेगळा पैलू ठरला.
या सोहळ्याला रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे, नगरसेवक अमित विलणकर, केतन शेट्ये, माजी नगरसेविका सत्यवती बोरकर, शिवसेना तालुकाध्यक्ष संजू साळवी यांच्यासह नितीन तळेकर, सलिल डाफळे, मुकूंद विलणकर, भाई विलणकर, कमलाकर जोशी, रघुवीर शेलार, दीपक राऊत, निलेश कोतवडेकर, प्रवीण शिवलकर, आसावरी पावसकर, अमित पावसकर, अमित नागवेकर, अशोक मयेकर, अर्चना मयेकर आणि परेश कोतवडेकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि मार्गदर्शक मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे पालक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज (बंटी) जोशी आणि साई खेऊर यांनी केले, तर नियोजनाची धुरा मनिष जोशी आणि संतोष पावसकर यांनी सांभाळली.