कुर्धे येथे साकवाचा स्लॅब अंगावर कोसळून तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी (वार्ताहर )
कुर्धे येथे पऱ्यावर बांधण्यात आलेल्या स्लॅबच्या साकवाखाली काम करत असताना पाखाडीचा स्लॅब अंगावर कोसळून 27 वर्षे कामगाराचा जागीच मृत्यू झाला ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश शिवाजी काटे (वय 27 राहणार शांतीनगर रत्नागिरी) हा कुर्धे येथील लिंगायत वाडी आणि खोताची वाडी दरम्यान पऱ्यावरील पाखाडीच्या कामासाठी गेला होता. सोमवारी पडलेल्या पावसामुळे पऱ्यावर टाकलेल्या पाकाडीचा काही भाग वाहून गेला होता. मंगळवारी सकाळच्या सुमारास आकाश इतर कामगारांसह पऱ्यात उतरून साकवाच्या कामाला लागला होता. अचानक साकवाचा स्लॅब कोसळला आणि आकाश त्या खाली गाडला गेला. पर्यामध्ये पाणी असल्याने आकाशला शोधण्यास अडथळे निर्माण झाले होते. अखेरीस जेसीबीच्या साह्याने सर्व मलबा पाण्यातून बाहेर काढण्यात आला आणि आकाशला देखील बाहेर काढण्यात आले.
त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालय हलवण्यात आले मात्र येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले या घटनेची नोंद पूर्णगड पोलिस स्थानकात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.