कोकण नगर मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांपासून वाहन चालकांना मिळाला दिलासा
रत्नागिरी : गेल्या काही काळापासून मारुती मंदिर ते मजगाव या मुख्य रस्त्यावरती कोकण नगर येथील भागातील रस्त्यांवर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. मात्र, स्थानिक लोकप्रतिनि व या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर हे खड्डे बुजविण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे.
या भागातील लोकांनी तसेच कार्यकर्त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामान यांच्याकडे पाठपुरावा केल्याने या समस्येची गंभीर दखल घेतली होती. कोकण नगर परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे पादचारी आणि वाहनचालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते, तसेच अपघातांचा धोकाही वाढला होता.
तसेच या भागातील लोकांनी तसेच कार्यकर्त्यांनी यांनी संबंधित प्रशासकीय विभागाकडे सातत्याने आणि आक्रमकपणे पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, प्रशासनाने तातडीने पावले उचलत कोकण नगरमधील खड्डे बुजविण्याचे काम मार्गी लावले.
खड्डे बुजविण्यात आल्यामुळे आता या भागातील रस्ते वाहतुकीसाठी अधिक सुरक्षित आणि सुळसुळीत झाले आहेत. यामुळे स्थानिक नागरिक, चाकरमानी आणि वाहनधारकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याबद्दल कोकण नगरमधील नागरिकांनी समाधान व्यक्त करत आहेत.