लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार ;संशयित न्यायालयीन कोठडीत
रत्नागिरी :- लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेची फसवणूक आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयिताला सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित मधुसूदन देसाई (रा. हातखंबा गुरववाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. २०१६ मध्ये संशयिताने पीडित महिलेच्या पतीसोबत ओळख निर्माण केली होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत त्याने पीडितेशी मैत्री वाढवली व लग्नाचे खोटे वचन देऊन संशयिताने पीडित महिलेची फसवणूक केली. तसेच वेळोवेळी तिच्याशी जवळीक साधून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक – लैंगिक संबंध प्रस्थापित केले. फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने अखेर पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६९ अन्वये १६ मे २०२६ संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयिताला ताब्यात घेतले. सध्या या प्रकरणातील संशयित हान्यायालयीन कोठडीत असून अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.