परकार हॉस्पिटलच्या डायलिसिस विभागात आग; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली
धुराच्या लोंढ्याने अनेक रुग्ण गुदमरले
कर्मचाऱ्यांसह नागरिकांची बचावासाठी धाव
रत्नागिरी
रत्नागिरीतील शिवाजी नगर येथील प्रसिद्ध परकार हॉस्पिटलच्या डायलिसिस विभागात सोमवारी सकाळी अचानक आग लागली. शॉर्ट सर्किट झाल्याने आगीचा भडका उडाला. बघता बघता आगीने मोठे रूप धारण केले. आगीने डायलिसिस विभागात धुराचे प्रचंड लोण निर्माण झाल्याने डायलिसिस विभागातील अनेक वृद्ध रुग्ण गुदमरले. सुरुवातील आग छोटी असताना आगीवर नियंत्रण न मिळवल्याने आगीचा भडका उडाला. आग लागल्याचे कळताच रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. येथील रुग्णाला कर्मचाऱ्यांनी तत्काळ बाहेर काढत अन्य रुग्णालयात हलवले. आग आटोक्यात आणण्यासाठी रनप च्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले.
