गुहागरात तीन घटनांमध्ये तिघांचा मृत्यू
गुहागर: तालुक्यातील आबलोली ते शिवणे दरम्यान दुचाकीने प्रवास करताना खोडदे-निवातेवाडी येथे दुचाकी वहाळामध्ये घसरून झालेल्या अपघातात स्वप्नील यशवंत सुर्वे (३५, शिवणे बौद्धवाडी) या तरुणाचा मृत्यू झाला. तसेच अंजनवेल सडेवाडी येथील २७ वर्षीय ओंकार विजय सैतवडेकर याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केली तर कुडली बौद्धवाडी जयानंद यशवंत रणपीसे (६१) यांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गुहागर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ११ वाजता स्वप्नील यशवंत सुर्वे हा आबलोली ते शिवणे असा दुचाकीने प्रवास करत होता. तो खोडदे निवातेवाडी येथे आला असता रस्त्याच्यानजीकच्या वहाळामध्ये दुचाकी घसरून पडल्याने डोक्यावर आपटला.
यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. स्वप्नील सुर्वे नोकरीनिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असतो. सदर प्रकरणी शिवणे येथील योगेश महादेव सुर्वे यांनी फिर्याद दाखल केली असून २९ मे रोजी गुहागर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी स्वप्नील सुर्वे याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कुडली येथे वृद्धाचा आकस्मिक मृत्यू तालुक्यातील कुडली-बौद्धवाडी येथील जयानंद यशवंत रणपीसे यांना गुरुवारी सकाळी ९.४५ वाजता अचानक ताप येवून अंग दुखू लागल्याने रोहन जयानंद रणपीसे आबलोली येथील डॉ. निवाते यांच्याकडे तपासणीसाठी घेऊन गेले. तेथे त्यांना जास्त त्रास जाणवू लागल्याने अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कामथे येथे घेऊन जाण्यास सांगितले.
मात्र कामथे गळफासाने तरुणाची आत्महत्या गुहागर तालुक्यातील अंजनवेल सडेवाडी येथील २७ वर्षीय ओंकार विजय सैतवडेकर २९ मे रोजी दुपारी १२. ३० वाजता राहत्या घरातील किचनच्या छताच्या भालाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.
या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गळफास घेऊन आत्महत्या म्हणून नोंद केली आहे. उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून जयानंद रणपीसे यांना मृत घोषित केले. याबाबतची फिर्याद रोहन रणपीसे यांनी दिली असून आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.