सुंदर बसस्थानक स्पर्धेत माखजन द्वितीय
माखजन: एकेकाळी समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या,माखजन बसस्थानकाचा कायापालट करण्यात माखजन चे महत्वाकांक्षी सरपंच महेश बाष्टे यांना यास आले आहे.माखजन बसस्थानकाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वछ सुंदर बसस्थानक स्पर्धेत क गटात द्वितीय क्रमांक पटकवला आहे.
काळवंडलेल्या भिंती,पिण्याच्या पाण्याचा आभाव,अस्वच्छ मुताऱ्या,शौचलायचा पत्ताच नाही,बंद उपहारगृह,खड्डेमय,चिखलमय परिसर,गळके पत्रे,रात्री अपुरा उजेड आणि रात्री उनाड गुरांचा ठिय्या अशा एक ना अनेक समस्यांनी ग्रहण लागलेल्या माखजन बसस्थानकाच्या चक्क अर्धे पान बातम्या छापून यायच्या,सोयी सुविधा हा शब्दच फिका पडेल अशी अवस्था माखजन बसस्थानकाची होती.प्रवाशांच्या सेवसेसाठी या परिवहन मंडळाच्या ब्रीद वाक्य ,या बसस्थानकात उच्चारताना अगदी हसाव की रडावं अशी वेळ यायची.
पण शासकीय यंत्रणेच्या मागे लागून या सगळ्या गोष्टी बदलून दाखवण्याचे भरीव काम माखजन ग्रामपंचायतीने केले.माखजन चे सरपंच महेश बाष्टे,उपसरपंच सौ पूजा डेरे व पूर्ण टीम ने सुनियोजित बदल घडवून,अशक्य ते शक्य करत माखजन बसस्थानकाला क गटात द्वितीय क्रमांक मिळवून दिला.या साठी प्रवासी वाहतूक संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष पाडळकर यांनी देखील मेहनत घेतली. मुंबई,पालघर,रायगड,रत्नागिरी,ठाणे विभागात हा द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
रंगरांगोटी केलेली इमारत,गाड्यांची पुकारणी,चालू असलेले उपहारगृह,स्वछ प्रसादान गृहे,स्वछ परिसर,पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय,आदी साऱ्या गोष्टींनी माखजन चे बसस्थानक साऱ्या प्रवाशाना आकर्षित करत आहे.
देवरुख आगारच्या या बस स्थानकाचा १ जून रोजी सकाळी १० वाजता प्रादेशिक कार्यालय मुंबई प्रदेश, येथे सन्मान होणार आहे.माखजन बसस्थानकाचा क्रमांक आल्याने सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.